(Mumbai local train) लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली “ही” घोषणा

मुंबई : मुख्यमंतत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज रात्री आठ वाजता संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 15 दिवस झालेल्या नागरिकांना 15 ऑगस्टपासून मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. (Good news for local travelers) दोन्ही डोस घेण्यांची संख्या 15 लाख असून, प्रवासासाठी पास दिला जाणार असल्याचे सांगितले. (Mumbai local train services

 

राज्यात काही प्रमाणात शिथिलता दिला जात आहे. कार्यालयीन कामकाज बंद करुन आम्हालाही मजा वाटत नाही. मी तर म्हणतो 24 तास काम सुरु ठेवा, पण वेळेचे नियोजन करा. गर्दी होऊ देऊ नका. गर्दी झाली तर रुग्णवाढ होण्याचा धेका असतो, त्यामुळे कार्यालयीन कामाची विभागणी करा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना दिली आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल. ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत, असे प्रवासी मोबाईल एपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील, असे सांगितले. Mumbai local train services)

 

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या काळात एनडीआरएफकडून केल्या जाणाऱ्या मदतीच्या निकषात बदल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत इम्पिरिकल डेटाची मागणी आपण केंद्राकडे केली होती. तसेच मराठा समाजाबाबत आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला द्या, आरक्षणाची 50 टक्क्यांची अट रद्द करा, अशी मागणीही केली होती. यानुसार दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरक्षणाचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यावर आता लोकसभेत चर्चा होईल. मात्र, फक्त अधिकार देऊन फायदा होणार नाही. तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल. मला विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अटही काढतील. (Mumbai local train services)

Local ad 1