“आधी तुम्ही ठणठणीत व्हा” ; दोषींवर कडक कारवाई होईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई Thane news :  ठाणे महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे (Thane Municipal Corporation Assistant Commissioner Kalpita Pimple) यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात पिंपळे यांच्या हाताची बोटे शस्त्रक्रिया करून जोडण्यात आली आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कल्पिता पिंपळे यांच्याशी आज फोनवरून संवाद साधत धीर दिला. (Communicated over the phone) 

 

“तुमच्यावर हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल, तुम्हाला चिंता करायची गरज नाही, तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्याच व्हा, असा धीराचा सल्ला पिंपळे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Mayor of Thane Municipal Corporation Naresh Mhaske) यांनी कल्पिता पिंपळेंची भेट घेतल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे करून दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असा शब्द दिला आहे.

 

मुख्यमंत्री काय म्हणाले ?
“मला रोज रिपोर्ट येतात. उगीच त्रास नको म्हणून लवकर संपर्क साधला नाही. मला माहिती मिळत असते. तुम्ही लवकर बऱ्या व्हा.

 

ठाणे महापालिका अतिक्रमण विभाग आले अॅक्शनमोडवर

ठाणे महापालिका सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर अनधिकृत फेरीवाल्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात त्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता ठाणे महापालिका अतिक्रमण विभाग पुन्हा अॅक्शनमोडमध्ये आला आहे. ठाणे बाजारपेठेत महापालिका अतिक्रमण विभागाने अनधिकृत बसलेल्या फिरीवाल्यांचे सामान जप्त करत वाढीव बांधकाम केलेल्या दुकानांवर जोरदार कारवाई केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात अतिक्रमण विभागाने तीन टीम तयार केल्या आहेत. ज्याठिकाणी अनधिकृत फेरीवाले बसलेले असतील त्यांच्यावर अशा प्रकारच्या कारवाईला केली जात आहे. (Thane Municipal Corporation Assistant Commissioner Kalpita Pimple)

Local ad 1