बीडच्या राजकारणात भुकंप : भाजपच्या 25 पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे (Resigned)
बीड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळात फेरबदल केले असून, त्यात महाराष्ट्रातातून चौघांना संधी दिली आहे. बीडच्या खासदार डाॅ. प्रितम मुंडे (MP pritam munde) यांचे नाव चर्चेत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना मंत्री पदासंधी देण्यात आली नाही. त्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे देत आहेत. आतापर्यंत 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. (11 taluka presidents of Beed district resigned as Pritam Munde was not given a chance in the cabinet)
केंद्रीय मंत्रिमंडळात भाजप खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना स्थान न मिळाल्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. बीडमध्ये राजीनामा सत्र सुरुच असून भाजपचे विविध पदाधिकारी नाराजी व्यक्त करत राजीनामा देत आहेत. यापूर्वी 14 भाजप समर्थकांनी राजीनामा दिल्यानंतर आता बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच 11 तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. आतापर्यंत एकूण 25 पदाधिकाऱ्यांनी राजीमाना दिला आहे. 11 taluka presidents of Beed district resigned as Pritam Munde was not given a chance in the cabinet