बारावीचा निकाल उद्या ; दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन पाहता येणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या बुधवारी (दि.8) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यासंदर्भातील माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. (12th result tomorrow; Can be viewed online from 1 p.m.)

 

येथे पहा निकाल
www.mahresult.nic.in
https://www.mahahsscboard.in/
http://www.hscresult.mkcl.org/

 

राज्य मंडळाने यंदा दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल तर बारावीची परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान पार पडली. दहावी परीक्षेला राज्यभरातून तब्बल 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी बसले होते. तर बारावीच्या परीक्षेला 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थी बसले होते. बारावीची परिक्षा ऑफलाईन घेण्यात आली. (12th result tomorrow; Can be viewed online from 1 p.m.)

Local ad 1