Sanjay Raut : संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार?

मुंबई :  राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेखासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. (Sanjay Raut to join Bharat Jodo Yatra?)

 

 

नांदेड जिल्ह्यातील कापशी गुंफा येथेून भारत जोडो यात्रेची आज सकाळी उत्साहात सुरुवात झाली. या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. त्यामुळे आता जामिनावर सुटलेले खासदार शिवसेनेचे नेते संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. (Sanjay Raut to join Bharat Jodo Yatra?)

 

 

राज्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi)  प्रयोग करण्यात राऊतांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्या गाठीभेटी झाल्या होत्या. राऊतांची ईडी चौकशी सुरु झाल्यानंतर राहुल गांधी यांनी राऊत यांना पत्र लिहून काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिशी असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राऊत आता भारत जोडो यात्रेत सहभागी होणार का याची उत्सुकता वाढली आहे. (Sanjay Raut to join Bharat Jodo Yatra?)

 

 

 

नांदेड जिल्ह्यातून सुरू झालेल्या भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. या यात्रेमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार आहेत. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या यात्रेमध्ये संजय राऊत उपस्थित राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

 

 

दरम्यान महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून  उद्धव ठाकरे यांच्याऐवजी शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत दिसणार आहे  11 तारखेला सहभागी होणार आहेत. (Sanjay Raut to join Bharat Jodo Yatra?)

Local ad 1