Nashik ACB Trap । नाशिकमध्ये प्रांत अधिकाऱ्यावर चाळीस लाख रुपयांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल

Nashik ACB Trap । नाशिक :  पुणे विभागाचे अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड  लाच प्रकरण ताजे असतानाच आता नाशिक जिल्ह्यातुन लाचखोरीची बातमी समोर येत आहे. एक प्रांत अधिकाऱ्याने एका कंपनीची जमीन अकृषिक (NA) करून देण्यासाठी 40 लाख रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दाखवली.  त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Senior revenue official in Nashik on ACB)

 

 

निलेश अपार  (दिंडोरी उपविभागीय अधिकारी (प्रांत) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रांत अधिकऱ्याचे नाव आहे. एका खाजगी कंपनीची जागा अकृषक (एनए) करुन देण्यासाठी अपार याने तब्बल 50 लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत 40 लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे अपार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रार यांची दिंडोरी येथे कंपनी असून त्यांचे कंपनीचे बांधकाम करताना त्यांनी अकृषीक परवानगीं न  घेतल्याने त्यांचे कंपनीस आलोसे यांचेकडून नोटीस बजावण्यात आलेली होती. तसेच कंपनीचे उत्पादन बंद करण्याबाबत तोंडी सांगितलेले होते. सदर कंपनीवर कारवाई न करण्यासाठी तसेच बंद कंपनी पुन्हा सुरू करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 लाखाची मागणी केली, तसेच तडजोडी अंती 40 लाख रुपयेची मागणी करून स्विकारण्याची तयारी दाखविली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

सापळा  अधिकारी :  नरेंद्र पवार, पोलीस उप अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक

▶️ सापळा पथक :  पो.नि. संदिप साळुंखे, पो.हवा. डोंगरे पो.हवा. इंगळे

 ▶️  मार्गदर्शक :  शर्मिष्ठा  घारगे-वालावलकर,  पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक (Sharmistha Gharge-Walawalkar, Superintendent of Police, ACb Nashik) आणि माधव रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक (Madhav Reddy, Upper Superintendent of Police) ,ला प्र वि नाशिक परिक्षेत्र नाशिक

Local ad 1