गुजरातच्या पराभवानंतर राहुल गांधींचा आला ट्विट ; काय म्हणाले जाणून घ्या..

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशमधील काँग्रेसने (Congress) भाजपकडून (BJP) सत्ता हिस्कावली असून, गुजरात विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. त्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी काय बोलणार याकडे लक्ष लागले होते. काहीवेळापुर्वीच राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. (Rahul Gandhi thanks Himachal Pradesh polls)

 

 

राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले की, हिमाचलमधील निर्णायक विजयासाठी हिमाचलच्या (Himachal Pradesh Gujarat Election Result 2022) जनतेचे मनकपूर्वक धन्यवाद. तर गुजरातच्या पराभवावर ते म्हणाले की, आम्ही यापुढेही लढत राहू. सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन. तुम्ही घेतलेले कष्ट आणि झोकून देण्याची प्रवृत्ती अभिनंदनास पात्र आहेत. काँग्रेसने दिलेले सर्व आश्वासन आम्ही पूर्ण करू असा विश्वासही राहुल गांधी यांनी व्यक्त केला. (Rahul Gandhi thanks Himachal Pradesh polls)

 

 

गुजरातमधील दारुण पराभवाबद्दल राहुल गांधी म्हणाले, “गुजरातच्या जनतेचा जनादेश आम्ही नम्रपणे स्वीकारतो. आम्ही पुनर्रचना करू, कठोर परिश्रम करू आणि देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील जनतेच्या हक्कांसाठी लढा देत राहू. (Rahul Gandhi thanks Himachal Pradesh polls)

Local ad 1