Bharat Jodo Yatra। भारत जोडो यात्रेत राहूल गांधींचा दिसला अनोखा अंदाज

Bharat Jodo Yatra : कन्याकुमारी पासून काँग्रेस नेते खासदार राहूल गांधी यांच्या नेतृवात निघालेली भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या मध्य प्रदेशातील महू येथे पोहोचली. या ठिकाणी यात्रेच जोरदार स्वागत करण्यात आले. महू येथे राहूल गांधी अनोख्या अंदाजात दिसले. (Rahul Gandhi’s unique predictions on Bharat Jodo Yatra)

 

मध्य प्रदेशातील महू (Madhya Pradesh Mahu) इथे भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi) बाईक (Bike) चालवून यात्रेत सहभागी झालेले आणि त्यांना पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

 

याचवेळी राहुल गांधींना बाईकवर पाहून नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. यावेळी सुरक्षा व्यवस्थेत पोलीस दलालाची ही धावपळ झाली.

 

Rahul Gandhi rode a bike in Bharat Jodo Yatra
Rahul Gandhi rode a bike in Bharat Jodo Yatra

 

यात्रा मार्गावर बायपासवर एका ठिकाणी लाल गालिचा अंथरण्यात आला होता. रंगीबेरंगी कागद उडवून राहुल गांधींचे स्वागत करण्यात आले. यावेळी राहुल गांधी बाईक चालवताना दिसले. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती.

 

राहुल गांधींचा हा अनोखा अंदाज कार्यकर्त्यांना खूप आवडला असल्याचे दिसून आले. भारत जोडो यात्रेचा प्रवास 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाला असून, तो जानेवारी 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
Local ad 1