ब्लॅक पबच्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळले ?

भाजपच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांचा पोलिस आय़ुक्तांना सवाल

पुणे. शहरातील अनेक अवैध गोष्टींकडे पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले असून, पुणेकरांमध्ये पोलीस कारभाराबाबत तीव्र नाराजी आहे, त्याची दखल घेऊन त्वरित सर्वत्र कडक कारवाई करून कायदा, सुव्यवस्था राखावी, अशा मागणीचे निवेदन खासदार मेधा कुलकर्णी (MP Medha Kulkarni) यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार(Commissioner of Police Amitesh Kumar) शुक्रवारी दिले. तसेच कल्याणीनगर अपघात(Kalyaninagar accident) प्रकरणात ब्लॅक पबच्या (Black Pub) मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळण्यात आले?, असा जाब विचारला आहे. (Why was the name of the owner of the black pub omitted from the FIR?)

 

 

बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल (Construction businessman Vishal Agarwal) याचा मुलगा वेदांत अगरवालने (Vedanta Aggarwal) पोर्शे कारने दोघांना चिरडले आहे. त्या संदर्भातही खासदार मेधा कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. ब्लॅक या पबच्या मालकाचे नाव एफआयआर मधून का वगळण्यात आले? असा प्रश्नही त्यांनी चर्चेच्या दरम्यान उपस्थित केला. या केसमधील सर्वच्या सर्व गुन्हेगारांना, दोषींना त्वरित शासन व्हावे, अशी आग्रही मागणीही केली.

 

अनेक अवैध आणि नियमबाह्य गोष्टींना शहरात उधाण आले आहे. त्यात प्रामुख्याने अनधिकृत पब, बार, रूफ टॉप हॉटेल्सची अवैध बांधकामे, रात्री उशिरापर्यंत चालणारी हॉटेल्सलवरी कारवाई करावी, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.

 

Local ad 1