Sharad Pawar। शरद पवार पुन्हा पावसात भिजले !

Sharad Pawar : सातारा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) पावसात भिजले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार सोशल मिडियावर (Social media) चर्चेत आले. निकाल ही  त्यांच्याच बाजूने लागला. पुन्हा एकदा आज  पुण्यात शरद पवार पावसात भिजले आहेत. त्यामुळे त्या लोकसभा निवडणुकीची आठवण झाली. (Sharad Pawar got wet again in the rain)

 

 

पुण्यात बावधन परिसरात एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र, यावेळी मुसळधार पाऊस सुरु होता. मुसळधार पावसातही शरद पवार आपली लेक सुप्रिया सुळेंना सोबत घेत या कार्यक्रमात उपस्थित दर्शवली. दिवाळी निमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागरिकांनी या कार्यक्रमात प्रचंड प्रमाणात गर्दी दिसून आली. पावसामुळे शरद पवार या कार्यक्रमात गैरहजर राहू शकले असते मात्र त्यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.

 

बावधन मधील कार्यक्रमादरम्यान मुसळधार पाऊस पडत होता. सगळे नागरिक आणि कार्यकर्ते भर पावसात शरद पवारांची वाट बघत थांबले होते.  शरद पवारांची गाडी येताच अनेकांनी मोठ्याने घोषणाबाजी सुरु केली. सोबतच त्यांच्यावर फुल्लांचा वर्षाव केला. लेक सुप्रिया सुळेंचा हात धरुन शरद पवारांनी मंच गाठला. खासदार सुप्रिया सुळे देखील वडिलांसाठी तत्पर असल्याचे मंचावर पाहायला मिळाले.

Local ad 1