Heavy Rain in Pune। पुणे महापालिकेचे दावे ठरले फोल : फोटो फिचर
तासभराच्या पावसाने रस्ते जलमय
Heavy Rain in Pune। पुणे : महापालिकेचे “पावसाळ्यातील गटार-चेंबर स्वच्छता नियमित केली जाते” हे दावे फोल ठरले आहेत. मंगळवारी दुपारी अवघ्या तीन तासांत पडलेल्या मुसळधार पावसाने पुण्याचे जनजीवन विस्कळीत झाले. शहरातील प्रमुख रस्त्यांचे रूपांतर अक्षरशः तळ्यात झाले. परिणामी, वाहतूक कोंडी, पाणी तुंबणे आणि शेतमालाचे नुकसान अशा घटनांनी नागरिक त्रस्त झाले. रविवार रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत मुसळधार पावसाने शहराला झोडपले होते. त्यात मंगळवारी पुन्हा तासाभराच्या पावसाने पुणेकरांचे हाल केले. टिळक चौक, शिवाजी रस्ता, बुधवार पेठ, शास्त्री रस्ता, स्वारगेट, जंगली महाराज रस्ता, आपटे रस्ता, बीएमसीसी रस्ता, सेव्हन लव्हज चौक, फातिमानगर चौक, सेनापती बापट रस्ता, बाणेर, कोरेगाव पार्क आणि आळंदी रस्ता यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले.
कोंढवा येथे भिंत कोसळली, तर मार्केटयार्डात भाजीपाला बाजारात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी घुसल्याने शेतमालाचे नुकसान झाले. महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहरात अवघ्या २८ मिलीमीटर पाऊस झाला. भवानी पेठ, कोथरुड आणि कसबा पेठ भागात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एवढ्या पावसात ही शहर जलमय झाल्याने नागरिकांनी महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेक ठिकाणी गटाराचे झाकणं उघडून पाणी रस्त्यावरून वाहू लागले. काही ठिकाणी मैला मिसळलेले पाणी साचल्याने आरोग्य धोक्यात आले. तर माती, प्लास्टिक आणि लाकूड यामुळे चेंबर पूर्णपणे बंद झाले. प्रशासनाने स्वच्छतेचे दावे केले असले तरी प्रत्यक्षात मात्र निचऱ्याची व्यवस्था कोलमडलेली दिसली.
मंगळवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या परिसरात पावसाचा जोर अदिक होता. या तीन तासांमध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक ५४.४० मिलीमीटर पाऊस पडला. त्यापाठोपाठ कसबा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ४९.६० तर कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत यावेळेत ४८.४० मिलीमिटर पाऊस पडला. अचानकपणे पडलेल्या या पावसामुळे या भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामधून ये-जा करताना नागरिकांची आणि वाहनचालकांची तारांबळ उडत होती.
शहरातील विविध भागात झालेल्या पावसामुळे सांडपाणीवाहिनी फुटणे, झाडांच्या फांद्या पडणे, तर काही भागात पाणी वाहून जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. संबधित विभागांकडे या तक्रारी पाठविण्यात आल्या होत्या. आपटे रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर पाणी साचले होते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सर्व तक्रारी सोडविण्यात आल्या.
– गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पुणे महापालिका
वाहतूक कोंडी, नागरिक हैराण
रस्ते पाण्याखाली गेल्याने अनेक भागात वाहतूक कोंडी झाली. शहरात पाणी साठणाऱ्या 200 ठिकाणांची यादी तयार करून उपाययोजना केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र वास्तवात मंगळवारी नागरिकांना कोंडीतून मार्ग काढावा लागला. मान्सून परतण्याच्या प्रक्रियेत असला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. पुण्यात आज हवामान ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महापालिकेने पावसाचे पाणी साठणाऱ्या 200 ठिकाणांची यादी तयार केली होती. यातील अनेक ठिकाणी उपाययोजना केल्याचा दावा करण्यात आला. मात्र वास्तवात नागरिकांना वारंवार जलभराव आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आणि पुणेकरांना कोंडीतून मार्ग काढावा लागला.
२८ मिलीमीटर पावसातही जलमय शहर
महापालिकेच्या आकडेवारीनुसार मंगळवारी दुपारी १२ ते ३ या वेळेत शहरात २८ मिलीमीटर पाऊस झाला. भवानी पेठ, कोथरुड व कसबा पेठ या भागात ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. एवढ्या कमी पावसातही शहर ठप्प झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पावसामुळे अनेक गटारांची झाकणं उचकटून पाणी रस्त्यावर वाहू लागले. काही ठिकाणी मैला मिसळलेले पाणी रस्त्यावरून वाहत होते. तर चेंबर झाकणांवर अडकलेली माती, लाकूड, प्लास्टिक आणि खडे यामुळे निचरा पूर्णपणे थांबला होता. प्रशासनाने कचरा काढल्याचा दावा केला असला तरी नागरिकांचा अनुभव वेगळाच होता.
Waqf Amendment Act 2025 । तीन तरतुदींवर स्थगिती, मिस फरहा फाउंडेशनची महत्वाची भुमिका
मलनिस्सारण विभागाचे मुख्य अभियंता म्हणाले, जगदीश खानोरे म्हणाले, “पावसाळी गटारांची नियमित स्वच्छता केली जाते. ज्या ठिकाणी पाणी साचते, तिथे तात्काळ पथके पाठवली जातात. ठेकेदारांना जबाबदारी पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.”