मोशीत देशी, विदेशी दारूचा कारखान्याचा भांडाफोड ; तळेगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी 

पुणे : चाकण (Chakan) परिसरातील नानेकरवाडी येथे एका चायनीज सेंटर मध्ये बनावट देशी व विदेशी दारूची विक्री (Sale of domestic and foreign liquor) केली जात आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली . त्यानुसार मारलेल्या छापमारीत देशी व विदेशी दारूचा साठा मिळून आला. तर आरोपीने चौकशीत दिलेल्या माहितीच्या आधारे मोशी गावात सुरू असलेल्या बनावट मद्याच्या कारखान्याचा भांडाफोड करण्यात आले. त्याठिकाणी बनावट दारू तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. (Dese, foreign liquor factories ransacked in Moshi)

 

 

उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव विभागाच्या पथकाला नानेकरवाडी येथील सम्राट चायनीज सेंटरमध्ये बेकायदा दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी बनावट देशी दारु टॅंगोपंच १८० मिली क्षमतेच्या ४५ बाटल्या, बनावट रॉयल स्टॅंग १८० मिली क्षमतेच्या ६ बाटल्या असा एकूण 4 हजार 230 रुपयांचा मुददेमाल मिळून आला. सूरज राजू माने ( वय-२७ ) रा. मेदनकरवाड़ी ता खेड जि.पुणे याला अटक करण्यात आली. (Dese, foreign liquor factories ransacked in Moshi)
आरोपी माने याच्याकडे बनावट दारू कोणाकडून आणला याविषयी चौकशी केली. त्यात आरोपी माने याने दिलेल्या माहितीनुसार मोशीगाव आ्हाट वस्तीमधील इमारतील जिन्या जवळील तळमल्यावरील खोलीत तो स्वत: बनावट
देशी व विदेशी मदयाची निर्मिती करत होता. बनावट देशी मद्य बनवत असताना देशी दारु टैगो पंच १८० मिली क्षमतेच्या बाटल्याचे झाकण दाबनाच्या साह्याने उघडून  त्यात पाणी मिश्रित मद्य भरून तो विक्री करत होता. बनावट विदेशी मद्य निर्मिती करत असताना स्वस्त असलेली मद्य महागड्या बाटलीत भरून विक्री करायचा. या ठिकाणावरुन देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
आरोपी माने याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (AXBXCXD)(EXF) १.१०३ नुसार गुन्हा रजिस्टर २३४/२०२२ द. ६१४२०२२ गुन्हा नोद केला आहे.(Dese, foreign liquor factories ransacked in Moshi)
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, पुणे विभागाचे  उप आयुक्त ए.बी. चासकर, पुण्याचे अधीक्षक बी. राजपूत, पिपरी चिंचवड, राज्य उत्पादन शुल्कचे उप अधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. (Dese, foreign liquor factories ransacked in Moshi)
  • संजय सराफ निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभाग पुणे. समीर पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र१ पुणे, एम आर राठोड, बी. एस घुगे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र १ पुणे. व दुव्यम निरीक्षक एस.टी. भरणे.  सहाय्यक दुर्यम निरीक्षक रखी लोखंडे व जवान  आर. ए. कादी,  शिवाजी गळवे राहुल जॉजाळ रोहिदास गायकवाड, सुरज घुले, मुकुद पोटे, जयान नि वाहन चालक हनुमंत राऊत शरद हंडगर यांनी सहभाग घेतला. पुढील तपास एस.टी. भरणे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तळेगाव दाभाडे विभाग बीट क्र १ या करीत आहेत.
Local ad 1