रानमळा पॅटर्नचे प्रवर्तक पी टी शिंदे यांचे दिल्लीत निधन  

पुणे : रानमळा पॅटर्नचे (Ranmala pattern) प्रवर्तक पी. टी. गुरुजी उर्फ पोपटराव तुकाराम शिंदे (वय ८९) वर्षे, यांचे दिल्ली येथे सोमवारी (दि २२) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी धडकताच खेड तालुक्यात शोककळा पसरली. (PT Shinde, the pioneer of Ranmala pattern, passed away in Delhi)

 

 

 

माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य, खेड तालुक्यातील आदर्श गाव रानमळाचे माजी आदर्श सरपंच, जिल्हा परिषद शाळेचे माजी आदर्श शिक्षक, पर्यावरण जागर प्रतिष्ठान चे संस्थापक व निसर्ग मित्र, विद्यार्थ्यांना घडविण्यात हाडाचा शिस्तबध्द कर्मकठोर आदर्श शिक्षक, जाणीव जागृती मंच सदस्य, एक आदर्श उत्तुंग, धुरंदर, मुत्सद्दी, कलात्मक, व्यक्तिमत्व म्हणून पी. टी. शिंदे यांची ओळख होती. (PT Shinde, the pioneer of Ranmala pattern, passed away in Delhi)

 

 

 

 

वृक्ष लागवड व जतन करण्यासाठी केलेल्या कामाबद्दल शिंदे यांना दिल्ली येथील एका संस्थेच्या वतीने विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते सोमवारी दिल्ली येथे उपस्थित होते. (PT Shinde, the pioneer of Ranmala pattern, passed away in Delhi)

 

 

 

त्यांच्या मागे पंचायत समितीच्या माजी सदस्या मंगल शिंदे, मुलगा मिलिंद, दोन मुली तसेच सुन, नातवंडे असा परिवार आहे. (PT Shinde, the pioneer of Ranmala pattern, passed away in Delhi)

Local ad 1