एकनाथ शिंदे यांच्या सरकाने विश्वास ठराव जिंकला

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी जाहीर केले. (Eknath Shinde’s government won the confidence resolution) 

 

 

 

विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत शिंदे-फडणवीस सरकारने जिंकली आहे. 164 मतांनी सभागृहात बहुमत सिद्ध करत एकनाथ शिंदे यांनी ही चाचणी पास केली आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारने पहिला विजय मिळवलाय. पण आज त्यांची खरी कसोटी होती. (Eknath Shinde’s government won the confidence resolution)

 

 

 

सोमवारी सकाळी 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरु झाल्यानंतर आवाजी मतदानाने बहुमत चाचणी पार पडली. यात शिंदे यांच्या प्रस्तावाच्या बाजूनं 164 मते पडली. तर या प्रस्तावाच्या विरोधात 99 मतें पडली. काल विधानसभा अध्यक्ष निवडीच्या प्रस्तावाच्या विरोधात 107 मते पडली होती. आज बहुमत चाचणीच्या वेळी शंभरीही गाठता आली नाही. (Eknath Shinde’s government won the confidence resolution)

Local ad 1