...

एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा : आता महाराष्ट्रात प्रवास फक्त 8 तासांत शक्य !

 उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘अॅक्सेस कंट्रोल ग्रीड’ यंत्रणेबाबत घोषणा

पुणे, ६ जून २०२५ – “महाराष्ट्रात आता कोणत्याही टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवासासाठी ८ तासांपेक्षा अधिक वेळ लागणार नाही. यासाठी ‘अॅक्सेस कंट्रोल ग्रीड’ ही आधुनिक वाहतूक व्यवस्था उभी केली जाणार आहे,” अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (politics eknath shinde access control road grid development pune)

 

 

पुण्यात आयोजित क्रेडाई पुणे या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. या समारंभात मनीष जैन यांनी अध्यक्षपदाची सूत्रे मावळते अध्यक्ष रणजित नाईक नवरे यांच्याकडून स्वीकारली. व्यासपीठावर सतीश मगर, ललितकुमार जैन, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग, तसेच मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे उपस्थित होते.

रस्त्यांचा विकास हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “रस्ते हे केवळ दळणवळणाचे साधन नसून ते विकासाचे गाभा असतात. चांगले रस्ते असल्यास शहरांची प्रतिमा उजळते, गुंतवणूक आकर्षित होते, आणि रोजगारनिर्मिती होते. प्रवास तासांच्या आत होईल, यासाठी ‘अॅक्सेस कंट्रोल ग्रीड’ ही प्रगत रचना उभारली जाईल. यातून उद्योग, पर्यटन आणि नागरी जीवनाच्या गतीला चालना मिळेल.”

 

 

बांधकाम क्षेत्राला महत्त्व – महसूल आणि रोजगाराचा कणा

शिंदे यांनी बांधकाम क्षेत्राच्या आर्थिक महत्त्वावर प्रकाश टाकत सांगितले की, “बांधकाम व्यवसायातून राज्याला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो आणि लाखो लोकांना रोजगार ही मिळतो. त्यामुळे या क्षेत्राला अडचणी मुक्त करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.”ते म्हणाले, “सर्वंकष विकास नियंत्रण नियमावली (UDCPR) आणि नवीन गृहनिर्माण धोरण तयार करताना विकासकांच्या गरजा आणि अडचणी लक्षात घेऊन निर्णय घेतले गेले आहेत. (politics eknath shinde access control road grid development pune)

 

पुण्यातील बांधकाम क्षेत्राशी संबंधित अनेक समस्या आणि त्यांच्या उपाययोजनांबाबत शिंदे यांनी काही स्पष्ट आश्वासने दिली. “टीडीआरसंदर्भात ऑनलाइन पोर्टल तयार केले जाईल. इमारतींच्या उंचीच्या मर्यादा मुंबई-ठाणेप्रमाणेच बदलता येतील का, याचा विचार सुरू आहे. पीएमआरडीएचा रखडलेला विकास आराखडा, हरित इमारती संदर्भातील नियमावली यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील. जे प्रश्न तत्काळ सुटू शकतील, ते तातडीने सोडवले जातील,” असे त्यांनी नमूद केले.

 

 

पुणे शहराचे प्रश्न आणि अधिकाऱ्यांची टीम

पुणे शहरासमोरील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी आणि पुरनियंत्रण यांसारख्या समस्या प्रलंबित आहेत. याबाबत बोलताना शिंदे म्हणाले,“पुणे शहरात जिल्हाधिकारी, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे सक्षम आयुक्त कार्यरत आहेत. या अनुभवी अधिकाऱ्यांच्या टीममधून पुण्यातील प्रश्न सुटतील, असा मला विश्वास आहे.” (politics eknath shinde access control road grid development pune)

 

‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’

कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. शिवसेनचे पुणे शहर शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ‘CM – Common Man’ असा उल्लेख केला होता. त्याचा उल्लेख करत शिंदे हसत म्हणाले, “जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा ‘सीएम’ म्हणजे कॉमन मॅन होतो. आता मी उपमुख्यमंत्री आहे, त्यामुळे ‘डीसीएम’ म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहे.”

  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी घोषणा – राज्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास 8 तासांत शक्य होणार, रस्ते आणि बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचे निर्णय, PMC व PMRDA संदर्भातील आश्वासने. (politics eknath shinde access control road grid development pune)

 

Local ad 1