Bharat Jodo Yatra । भारत जोडो पदयात्रेत सहभागी होणार्‍यांसाठी पोलिसांनी केली महत्वाची सूचना

Bharat Jodo Yatra । नांदेड : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रा  मंगळवारी नांदेड जिल्ह्यात दाखल होत आहे. यासंदर्भात नांदेड पोलिसांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. (Police has issued an important notice for those participating in the Bharat Jodo yatra) 

 

नांदेड जिल्हयात येण्याऱ्या सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी पोलीस प्रशासनाने काढलेल्या अधिसुचनेनुसार पर्यायी वळण मार्गाचा  वापर करावा. तसेच आपली वाहने आयोजकांनी व पोलीस प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Police has issued an important notice for those participating in the Bharat Jodo yatra)

 

पार्किेगची ठिकाणे व सर्वसाधारण सुचना पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली असून, या यात्रेला देशभरात खुप मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा नांदेड जिल्हात येत असून, या यात्रेत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे. जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यासाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी योग्य नियोजन करावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. (Police has issued an important notice for those participating in the Bharat Jodo yatra)

 

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यात्रेसाठी 28 पदाधिकारी नियुक्त केले आहेत. सगळे पदाधिकारी सध्या नांदेडमध्ये दाखल झाले. नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेड मुक्कामीच असणार आहेत. देगलूरहून सुरू होणारी भारत जोडो यात्रेसाठी महाविकास आघाडी घटक पक्षातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, विरोेधी पक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सह महाविकास आघाडीतील नेत्यांना या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे.

Local ad 1