BMC Election Ward | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) झटका दिला आहे. मुंबई महापालिकेतील वॉर्ड (BMC Election Ward) पुनर्रचना जैसे थे ठेवा, असे आदेश दिले आहेत. मविआ सरकारने मुंबई महापालिकेसाठी 236 वॉर्ड केले होते. ती संख्या शिंदे सरकारने कमी करुन 227 वॉर्ड केली होती. (Mumbai Municipal Corporation now has 236 wards)
Related Posts
महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईतील वॉर्डरचना नऊने वाढवून ती 227 वरुन 236 वर नेली होती. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत त्याला विरोध केला होता. वाढवलेले नऊ वॉर्ड हे शिवसेनेच्या फायद्यासाठी असल्याचा आरोपही भाजपने त्यावेळी केला होता. शिंदे सरकारने हे वाढवलेले नऊ वॉर्ड रद्द केले होते. (Mumbai Municipal Corporation now has 236 wards)
मविआ सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने हे वॉर्ड रद्द करण्यात आल्याची माहिती देत शिंदे सरकारने निर्णय घेतला होता. त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करुन ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती, त्या प्रमाणे कायम ठेवली होती. या निर्णयाला शिवसेने सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले होते. (Mumbai Municipal Corporation now has 236 wards)