आ. रविंद्र धंगेकर यांचा पोलिस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन , पोलिस आयुक्तांची बदली करा

पुणे, कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station अधिकार्‍यांनी बांधकाम व्यावसायिकाकडून कोट्यवधी रुपये घेतले. यामुळे तपास अधिकार्‍यांना निलंबित करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच अपघात प्रकरणात दोषी अधिकार्‍यांना पाठीशी घातल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी शुक्रवारी पोलिस आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. (MLA Ravindra Dhangekar aggressive for the transfer of Pune Police Commissioner)

 
यावेळी बोलताना धंगेकर म्हणाले, कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अक्षम्य चुका केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार बांधकाम व्यावसयिकांना धार्जिणे आहेत. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Builder Vishal Aggarwal) यांच्या व्यावसायिक कामातही अनियमितता आहे. बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून त्यांनी कामे केली आहेत. अगरवाल यांचे मुंबईतील गुंड टोळ्यांशी संबंध आहेत. याबाबतचा तपास थांबलेला आहे. याप्रकरणाची गृह खात्याने कसून चौकशी करावी. 
 
 
अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे तत्कालिन अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यास चालढकल केली. आता कल्याणीनगर अपघात प्रकरणातही पोलीस चालढकल करून आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही धंगेकर यांनी केला.पबचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. तरुण पिढीला वाचवण्यासाठी पब संस्कृती मुळापासून उखडून टाकण्याचे धाडसी पाऊल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उचलावे. 
 
 
पब संस्कृतीमुळे कल्याणीनगर भागात अपघात घडला. प्रकरणातील दोषी असलेल्या अल्पवयीन आरोपी मुलाला वाचवण्यासाठी यंत्रणेने काम केले आहे. पोलिसांनी गुन्ह्यात जी कलमे लावणे आवश्यक होती, ती लावली नाहीत. त्यामुळे तपास अधिकार्‍यांना निलंबित करून पोलिस आयुक्तांची बदली करावी, तसेच कल्याणीनगर अपघात प्रकरणाची त्रयस्त यंत्रणेमार्फत किंवा निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही धंगेकर यांनी यावेळी केली.
 
 

रोज एका पोलिस ठाण्याचा पर्दाफाश करणार

 आमदार धंगेकर यांनी शुक्रवारी एक ट्विट केले असून त्यात मुढवा पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करत असल्याचा फोटो जोडला आहे. हा कॉन्स्टेबर वसुली वाला असून अशा प्रकारे रोज एका पोलिस ठाण्याचा पर्दाफाश करणार असल्याचे नमूद केले आहे. कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊनही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहे, असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…?  पुणे बिघडविणार्‍या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा, अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील, असा ईशारा धंगेकर यांनी दिला आहे.
 
Local ad 1