भाजपचा बालेकिल्ला कसा ढासळला, कसबा पेठेचा इतिहास काय सांगतो?

पुणे : कसबा पेठ मतदारसंघात (Maharashtra Assembly By Election 2023) काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. कसबा पेठ हा मतदारसंघ गेल्या 28 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात होता. त्यात खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) हे सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी झाले. बापट खासदार झाल्यानंतर  महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली. त्यात त्या विजयी झाल्या आहेत. (How BJP’s stronghold collapsed, what does the history of Kasba Pethe tell?)

 

 

 

 

कसबा पेठ मतदार संघात काँग्रेसने पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केली. यापु्र्वी १९९१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजयी झाला होता. त्यानंतर १९९५ पासून सतत भाजप उमेदवार विजय होत आला.1985 मध्ये कसब्याचे विद्यमान आमदार डॉ. अरविंद लेले हे जनसंघामधून होते. शिवसेनेने त्यांच्याविरोधात अप्पा थोरात यांना उमेदवारी दिली. उल्हास काळोखे हे काँग्रेस उमेदवार होते. जनसंघ, शिवसेना आणि काँग्रेस अशा तिरंगी लढतीमध्ये उल्हास काळोखे निवडून आले आणि भाजपच्या या बालेकिल्ल्याचा बुरुज प्रथमच ढासळला. परंतु त्यानंतर पुन्हा हा मतदार संघ भाजपने आपल्याकडे घेण्यात यश मिळविले होते. (How BJP’s stronghold collapsed, what does the history of Kasba Pethe tell?)

 

 

१९९१ मध्ये अण्णा जोशी विजयी झाले होते. त्यांना त्यानंतर पुढे खासदारकीची उमेदवारी मिळाली. त्यातही ते विजयी झाले. यामुळे कसब्यात पोटनिवडणूक लागली. त्यात भाजपने त्यावेळचे नगरसेवक गिरीश बापट यांना उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे माजी महापौर वसंतराव थोरात यांना उमेदवारी दिला. त्यावेळी भाजपतील ५ नगरसेवक अचानक फुटले. अन् गिरीश बापट यांचा पराभव झाला. थोरात विजयी झाले. पुन्हा आता नगरसेवक असणारे हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली. परंतु त्यावेळी नगरसेवक असलेले बापट यांचा पराभव झाला आता रासने यांचा पराभव झाला. या दोन्ही पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार विजय झाले. (How BJP’s stronghold collapsed, what does the history of Kasba Pethe tell?)

 

 

1995 पासून ही जागा भाजपकडून अन्य पक्षाकडे गेली नाही आणि भाजपने उमेदवार ही बदलला नाही. गिरीश बापट लोकसभेत खासदार झाले आणि त्या जागी तत्कालीन महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी दिली गेली. त्यांनीही विजयी होत हा बालेकिल्ला कायम राखला. आता मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. परंतु ब्राम्हण उमेदवार न दिल्याने हा समाज संतापला. नेहमी भाजपच्या पाठिशी राहणाऱ्या या समाजाने आता भाजपची कोंडी केली. यामुळे भाजप उमेदवाचा पराभव झाल्याचे म्हटले जात आहे. (How BJP’s stronghold collapsed, what does the history of Kasba Pethe tell?)

Local ad 1