Nanded ZP News । नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मिनल करनवाल

Nanded ZP News । नांदेड : राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (Transfer orders of 41 IAS officers in the state) जारी करण्यात आले. त्यात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुले (Zilla Parishad Chief Executive Officer Varsha Thakur-Ghule) यांचाही समावेश आहे. तर नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून मिनल करनवाल यांची नियुक्ती करण्यात आली.  (Minal Karanwal as Chief Executive Officer of Nanded Zilla Parishad)

 

 

 

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुले  यांची लातूर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Varsha Thakur-Ghuge (IAS:MH:2011) Chief Executive Officer, Zilla Parishad, Nanded has been posted as Collector Latur)  नंदूरबार येथील प्रकल्प संचालक सहाय्यक जिल्हाधिकारी मिनल करनवाल यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Minal Karanwal,(IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector, ITDP, Nandurbar NANDURBAR has been posted as Chief Executive Officer, Z.P., Nanded)

 

Minal Karanwal as Chief Executive Officer of Nanded Zilla Parishad..

 

लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांची धुळे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या जागी नांदेडच्या सीईओ वर्षा ठाकूर-घुले हे नवे लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून  नियुक्त करण्यात आले. (Abhinav Goel (IAS:MH:2016) Chief Executive Officer, Zilla Parishad, Latur has been posted as Collector, Dhule.) गोंदिया येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अनमोल सागर यांची लातूर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Anmol Sagar (IAS: MH: 2019), Assistant Collector, Deori Sub Division, GONDIA has been posted as Chief Executive Officer, Z.P., Latur)

 

 

यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ( Dr.Shrikrishnanath B. Panchal, (IAS:MH:2016) Chief Executive Officer, Zilla Parishad, Yavatmal has been posted as Collector, Jalna). धुळे जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी असलेल्या तृप्ती धोडमिसे यांची सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. (Trupti Dhodmise (IAS:MH:2019) Project Officer-cum-Assistant Collector DHULE has been posted as Chief Executive Officer, Z.P., Sangli)

Local ad 1