मुंबई : राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश (Transfer orders of 41 IAS officers in the state) जारी केले आहे. त्यात धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे ( IAS officer Tukaram Mundhe ) यांचा ही समावेश आहे. विशेष म्हणजे मुंढे यांची बदली नुकतीच करण्यात आली होती. त्यातच पुन्हा बदलीचे आदेश निघाल्याने राज्याच्या प्रशासनात चाललंय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (IAS officer Tukaram Mundhe transferred again)
तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी असून, ते कडक शिस्तीचे आहेत. त्यांनी नवी मुंबई महापालिका तसेच नागपूर महापालिकेचं आयुक्त म्हणून कामकाज पाहिलं आहे. त्यासोबतच पुणे सार्वजनिक वाहतुक असलेल्या पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ही म्हणून त्यांनी काम केले होते. मुंढे यांची गेल्या 17 वर्षात 20 पेक्षा जास्त वेळा बदल्या झाल्या आहेत. आतादेखील अवघ्या दीड महिन्यात त्यांची बदली झाली आहे.
तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि ADF विभागात बदली करण्यात आली आहे. ते सध्या मंत्रालयात मराठी भाषा विभागात कार्यरत होते. पण आता त्यांची कृषी आणि एडीएफ विभागात बदली करण्यात आली आहे.