जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जेंव्हा अंगणवाडी ताईंसोबत सेल्फी घेतात..

नांदेड Nanded news : सेल्फी म्हणजेच स्वतःला मोबाईलमध्ये (Mobile phone) कैद करणे हा आहे. सेल्फी घेण्याचा छंद हा तरुणाईला मोठ्या प्रमाणात जोपासते. (The hobby of taking selfies is a big part of youth) प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे अनेक क्षण येतात, ते क्षण कॅमेरेत कैद करण्याचा मोह  कोणालाही आवरत नाही. असाच क्षण नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घूगे  (Zilla Parishad Chief Executive Officer Varsha Thakur-Ghuge) यांनी आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी घेत कैद केला आहे. तेंव्हा त्या अंगणवाडी ताईंना  (Anganwadi Tai) किती आनंद झाला असावा… (When the CEO takes a selfie with the Anganwadi tai)

 

 

जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीमध्ये दोन वृक्ष लावली जात आहे. (Two trees are being planted in the Anganwadi) त्याचा शुभारंभ लिंबगाव येथील अंगणवाडीतून प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आला.

 

 

घरोघरी मोठया श्रद्धेने निसर्गाच्या समीप घेवून जाणारा महिलांचा सण म्हणून हरतालिकाकडे पाहिले जाते. याचे औचित्य साधून नांदेड जिल्ह्यातील 3 हजार 779 अंगणवाडयामध्ये प्रत्येकी दोन वृक्ष याप्रमाणे एकूण 6 हजार 785 वृक्षांचे रोपण नुकतेच करण्यात आले. प्रत्येक अंगणवाडी दोन वृक्ष या गणितासमवेत अंगणवाडीची जबाबदारी असणार्‍या एक झाड अंगणवाडी सेविकेच्या नावाने तर दुसरे झाड मदतनिसाच्या नावे करण्यात आले आहे हे विशेष.

 

 

गावातील चिमुकल्यांच्या सुपोषणासाठी तसेच त्याच्या पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी, गरोदर महिलांच्या व स्तनदा मातांच्या पूरक आहारासाठी अंगणवाडी हा शासनाचा अत्यंत महत्वाचा दुवा आहे. अंगणवाडीत देण्यात येत असलेल्या आहाराची पौष्टिकता वाढावी, तो आहार खर्‍या अर्थाने सकस व्हावा यासाठी त्यात शेवग्याच्या शेंगाचा तसेच पानांचा खूप मोठा उपयोग करता येणे शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. (When the CEO takes a selfie with the Anganwadi tai.)

 

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घूगे (Zilla Parishad Chief Executive Officer Varsha Thakur-Ghuge), महिला व बाल विकास विभागाच्या सभापती सुशिलाताई हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कूलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. आर. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे आदी मान्यवर उपस्थित होते. (When the CEO takes a selfie with the Anganwadi tai)

 

Local ad 1