नांदेड Nanded news : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक भागात शेतकर्यांसह सखल भागात राहणार्या नागरीकांना खूप काही सोसावे लागले. यात मुखेड येथील माजी आमदार किशनराव राठोड (Former MLA Kisanrao Rathod) यांना आपले पुत्र (Bhagwan rathod) व नातु संदिप भगवान राठोड (Sandip bhagwan rathod) यांना मुकावे लागले 7 सप्टेंबर रोजी मुखेड-कौठा रोडवरील (Mukhed-kautha road) नाल्याच्या पुलावरुन वाहत्या पाण्यात ते चारचाकी वाहनासह वाहून गेले होते. त्यांचे मृतदेह 8 सप्टेंबर रोजी हाती लागले.
पालकमंत्री अशोक चव्हाण (Guardian Minister Ashok Chavan) यांनी तातडीने 8 सप्टेंबर रोजी नांदेड येथे पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. 9 सप्टेंबर रोजी त्यांनी अतिवृष्टीमुळे झालेला नुकसानीचा धावता आढावा घेत माजी आमदार किशनराव राठोड यांच्या भेटीसाठी मुखेड येथील कमळेवाडीकडे (Kamlewadi at Mukhed) धाव घेतली. येथे माजी आमदार किशनराव राठोड यांची त्यांनी भेट घेतली. सांत्वनपर झालेल्या या भेटीत पालकमंत्री अशोक चव्हाण यांना आपला गहिवर आवरता आला नाही.
स्व. शंकरराव चव्हाण यांच्यापासून किशनराव राठोड (Kisanrao Rathod) परिवाराचा स्नेह हा आजवर कायम राहत आलेला आहे. आपल्या असंख्य आठवणीला घेऊन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज किशनराव राठोड यांची भेट घेऊन सांत्वन करुन धीर दिला. या वयात ऐवढे मोठे दु:ख पचविणे सोपे काम नाही. जी स्थिती आली आहे त्याला सहन करण्याची इश्वर शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांनी केली. (Consolation of former MLA Kishanrao Rathore from Ashok Chavan)
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर (Zilla Parishad President Mangarani Ambulagekar), आमदार अमर राजूरकर (MLA Amar Rajurkar), आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार शामसुंदर शिंदे (MLA Dr. Tushar Rathore, MLA Shamsunder Shinde), माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार वसंत चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Collector Dr. Vipin Itankar) आदी मान्यवर उपस्थित होते.