केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या रुग्णा संख्येला हलक्यात घेऊ नका

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना  रुग्णांची संख्या वाढत असून, या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण (Union Health Secretary Rajesh Bhushan) यांनी राज्यांना उद्देशून पत्र (Letter) लिहिले आहे. त्यात त्यांनी वाढत्या कोरोना रूग्णसंख्येत गाफील राहू नका, अशा सूचना दिल्या आहेत. (Do not underestimate the growing number of corona patients)

 

हुश्श… विद्यार्थ्यांसाठी खुशखबर शाळा सुरु होण्याची तारीख जाहीर

गेल्या दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये आणि परिस्थिती हलक्यात घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, जसे आपण आत्तापर्यंत करत आलो आहोत असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे. (Do not underestimate the growing number of corona patients)

 

 राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3018 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर एका बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाणही झपाट्याने वाढत असून, कोरोनाचे सर्वाधिक सक्रीय रूग्णांची नोंद मुंबई आणि त्यापाठोपाठ ठाण्यात करण्यात आली आहे.

 

आंतरजातीय विवाह केल्यास मिळतो अर्थसाह्य, पण ते कोणाला जाणून घ्या..

देशात सव्वासात हजार रुग्ण

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 7240 नवीन रुग्ण आढळले आहेत. बुधवारी देशात 5233 नवे रुग्ण आढळले होते. याच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी 3741 नवे बाधित आढळले होते. त्यानंतर देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. (Do not underestimate the growing number of corona patients)

 

Local ad 1