गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांची संख्या 132, बजावकार्य सुरु

गुजरातमधील मोरबीत (Morbi) रविवारी झुलता पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह मिळाले आहेत.अजूनही बचावकार्य सुरू आहे. हा पूल चार दिवसांपूर्वीच दुरुस्त केला होता आणि त्यानंतर आता सलगच्या सुट्ट्यांमुळे गर्दी झाली आणि पूल कोसळला. गुजरात मध्ये दुर्घटना पूर्वी पुलावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली.  बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती गुजरात सरकारने दिली आहे. (Death toll in Gujarat’s Morbi Bridge disaster is 132)

 

 

मोरबी येथील माच्छू नदीवर (Machhu River) बनवण्यात आलेला हा झुलता पाच दिवसांपूर्वीच नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. रविवारी (sunday) संध्याकाळी 7 च्या सुमारास ह दुर्घटना घडली. दुर्घटना घडली त्यावेळी 500 हून अधिक नागरिक पुलावर उपस्थित होते. महिला आणि लहान मुलांचा सहभाग अधिक होता. या दुर्घटनेत 400 हून अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती आता वर्तवलीय जात आहे. तर आतापर्यंत 170 हून अधिक नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.(Death toll in Gujarat’s Morbi Bridge disaster is 132)

 

 

मदतीसाठी हेल्पलाईन नंबर

वायुसेनेच्या (air force) जवानांना बचावकार्यासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच गुजरात सरकारने (Gujarat Govt) मदतीसाठी 02822-243300 हेल्पलाईन नंबर (Helpline number) जारी केला आहे.(Death toll in Gujarat’s Morbi Bridge disaster is 132)

 

 

  • दुर्घटनेनंतर नौदलाच्या 50 कर्मचाऱ्यांसह NDRF, हवाई दलाच्या जवानांना रेस्क्यू ऑपरेशनकरता पाठवण्यात आले आहे. तसेच राजकोट सिव्हिल रुग्णलयात (Rajkot Civil Hospital) एक आयसोलेशन वॉर्ड (Isolation Ward) बनवण्यात आला आहे. मोरबी येथील हा झुलता पुल हा महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सुरू करण्यात आला आहे. पैसे कमवण्याच्या हेतूने हा पूल सुरू करण्यात आल्याचा आरोप आहे. (Death toll in Gujarat’s Morbi Bridge disaster is 132)
Local ad 1