गुजरातमध्ये केबल पूल तुटला 400 जण नदीत कोसळले, 32 जणांचा मृत्यू
मोरबी : गुजरातमधील (Gujarat) मोरबी (Morbi) येथील मच्छू नदीवर (Machu River) असलेला केबल पूल तुटल्याने सुमारे ४०० नदीत कोसळले आहेत. या घटनेत आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून, रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Cable bridge collapses in Gujarat, 400 people fall into river, 32 dead)
मोरबी येथील केबल पूल गेल्या ६ महिन्यांपासून बंद होता. दिवाळीच्या एका दिवसानंतर म्हणजेच २५ ऑक्टोबर रोजी तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. (Cable bridge collapses in Gujarat, 400 people fall into river, 32 dead)