Nanded corona update : नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन अंकावर, काळजी घ्या..

Nanded corona update नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या  257 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे 8 व ॲटीजन तपासणीद्वारे 3 अहवाल असे एकूण 11 कोरोना बाधित आले आहेत. (The number of corona patients in Nanded district has reached double digits)

 

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 842 एवढी झाली असून यातील 1 लाख 129 रुग्णांना उपचारा नंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 21 रुग्ण उपचार घेत आहेत. (The number of corona patients in Nanded district has reached double digits)

 

 

 

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  (The number of corona patients in Nanded district has reached double digits)

 

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृहविलगीकरणातील एका रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. आजच्या बाधितांमध्ये आरटी पीसीआर तपासणी द्वारे नांदेड मनपा 5, कंधार 1, किनवट 1, यवतमाळ 1 व ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, धर्माबाद 1 असे एकुण 11 कोरोना बाधित आढळले आहेत. नांदेड जिल्ह्यातील तालुक्यात अंतर्गत गृह विलगीकरण 6, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणात 15 असे एकुण 21 व्यक्ती उपचार घेत आहेत.

 

 

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. “मिशन कवच कुंडल” अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (The number of corona patients in Nanded district has reached double digits)
Local ad 1