Buldhana ACB Trap News । पुरवठादाराकडून 35 हजारांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक अटक

Buldhana ACB Trap News । बुलडाणा : तक्रारदार यांच्या फर्मद्वारे ग्रामपंचायत जयरामगड (जि. बुलढाणा) Gram Panchayat Jayaramgarh (District Buldhana) येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध (Scheduled Castes and Neo-Buddhists) घटकांचे वस्ती सुधार योजनेअंतर्गत केलेल्या कामासाठी साहित्य पुरविले होते. त्या साहित्याच्या बिलाचा मोबदला तसेच उर्वरित बिलाचा चेक देण्यासाठी ग्रामसेवकाने एकूण रक्कमेच्या सहा टक्के कमिशन म्हणून 35 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Buldhana Anti-Corruption Department) पथकाने ग्रामसेवकाला अटक केली. (Gram sevak arrested while accepting bribe of 35 thousand from supplier)

 

 

अच्युत माणिकराव काकडे Achyut Manikrao Kakade (वय-38 वर्ष, पद- ग्रामसेवक, ग्रामपंचायत पिंपरी धनगर/जयरामगड, वर्ग-3, रा. गौतम नगर, धामणदरी, येळगाव, ता.जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

 

 

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या फर्म द्वारे ग्रामपंचायत जयरामगड येथील अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांचे वस्ती सुधार योजने अंतर्गत केलेल्या कामासाठी पुरविलेल्या साहित्याचे काढलेल्या बिलाचा मोबदला तसेच उर्वरित बिलाचा चेक देण्यासाठी यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष एकूण सहा लाख रुपयाच्या बिलाच्या रकमेच्या 6 टक्के प्रमाणे 36 हजार रुपये लाचेची मागणी करून, तडजोडीअंती 35 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच सापळा कारवाईत 35 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक, मारुती जगताप (Maruti Jagtap, Superintendent of Police, Anti-Corruption Division, Amravati Zone) , अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Upper Superintendent of Police Devidas Gheware), पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे यांच्या मार्गदर्शनात सापळा व तपास अधिकारी ला. प्र. वि. बुलडाणाचे पोलीस निरीक्षक सचिन इंगळे (Police Inspector Sachin Ingle), यांच्या पथकाने ही कारवाई केली. या सपाळ्यात पो.ना. विनोद लोखंडे , जगदीश पवार, मोहम्मद रिजवान, रवींद्र दळवी, म.पो.काॅ. स्वाती वाणी, पो.काॅ. शैलेश सोनवणे, पो.काॅ. अरशद शेख आदी सहभागी होते.

Local ad 1