ACB Trap News सिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी तीन हजार रुपयांची लाच घेणारा ग्रामसेवक ‘एसीबी’च्या जाळ्यात  

ACB Trap News । चाकूर : मनरेगाअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीरीचा प्रस्ताव पंचायत समिती चाकुर येथे दाखल केला आहे. त्याचा मोबदला तसेच यापुढे सिंचन विहीर मंजूर करण्यासाठी मदत करण्यासाठी तीन हजार रुपयांची लचेची मागणी केली. ती पंचा समक्ष स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या ग्रामसेवकाला लाच घेताना दुसऱ्यांदा अटक करण्यात आली. (Gram seva arrested for taking bribe of Rs 3000)

 

 

परशुराम पंढरी गायकवाड (Parashuram Pandhari Gaikwad) (वय 50 वर्षे, पद – ग्रामसेवक, वर्ग 3, नेमणूक- पंचायत समिती चाकूर, ग्रामपंचायत – बोथी, ता. चाकूर जि. लातूर सध्या रा. शाहूनगर, थोडगा रोड, अहमदपूर ता. अहमदपूर जि. लातूर) असे अटक केलेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. (Gram seva arrested for taking bribe of Rs 3000)

 

 

तक्रारदार यांना मनरेगा अंतर्गत सिंचन विहीर घ्यायची होती. त्यासाठी ग्रामपंचायत मार्फत प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावा लागतो. त्यानुसार आरोपी ग्रामसेवक गायकवाड याने दाखल केलेल्या प्रस्तवाचा मोबदला आणि त्यापुढे मदत करण्यासाठी तीन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे सोमवारी करण्यात आली होती. तक्रारीच्या पडताळणीत लाच मगितल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर मंगळवारी 20 जून रोजी सापळा लावण्यात आला. त्यात ग्रामसेवक गायकवाड यांना चाकुर बस स्टँड येथील कॅन्टीनमध्ये लाचेची तीन हजार रुपये देण्यासाठी गेले असता गायकवाड यांनी पंचासमक्ष लाचेची रक्कम स्वतः स्विकरली. चाकुर पोलीस स्टेशन जि.लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

 

अँटी करप्शन ब्यूरो, नांदेडचे अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे (Anti Corruption Bureau, Nanded Superintendent Dr. Rajkumar Shinde) यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर अँटी करप्शन ब्यूरो पोलीस उप अधीक्षक पंडीत रेजितवाड (Latur Anti Corruption Bureau Deputy Superintendent of Police Pandit Rejitwad) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांच्यपथकाने ही कारवाई केली.

Local ad 1