रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” कविता संग्रहाला पुरस्कार
पुणे : रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” या काव्य संग्रहास नांदेडचा “कै.केवळबाई मिरेवाड” पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रभरातून आलेल्या 80 काव्य संग्रहातून रवी भिसे यांच्या “माझा निषेध झाला पाहिजे” (maza nished zala pahije) या काव्य संग्रहाची (Poetry collection) निवड झाली आहे.(Award for poetry collection by Ravi Bhise)
नांदेड येथील “मातोश्री कै. केवळबाई मिरेवाड” यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी साहित्यातील कादंबरी, कथासंग्रह, कवितासंग्रह आणि बालसाहित्य या विभागात दरवर्षी साहित्यिकांना पुरस्कार (Award to Literary) दिले जातात. कविता या प्रकारात रवी भिसे यांच्या ’माझा निषेध झाला पाहिजे’, आणि जळगाव येथील उषा हिंगोणेकर यांच्या ’धगधगते तळघर’ या काव्यसंग्रहाची राज्यभरातून निवड झाली आहे. (Award for poetry collection by Ravi Bhise)
Related Posts
“कविता जगण्याचं भान देते, आणि कल्पनेच्या पलीकडचा विचार मांडून वाचकांना विचार करण्यास भाग पाडते. “माझा निषेध झाला पाहिजे”, यात असंच काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे, पहिल्याच कवितासंग्रहाला मिळालेल्या या पुरस्कारामुळे खूप आनंदी आहे. आपण गांभीर्याने काही तरी लिहू पाहतो आणि वाचक त्याची दखल घेतात, तेव्हा खूप बरं वाटतं, या पुढे ही माणसाच्या जगण्याला वैचारिक हातभार लागेल असेच लिहीत राहीन.– रवी भिसे, कवी
परिस पब्लिकेशन पुणे (Paris Publication Pune) या प्रकाशना अंतर्गत ऑगस्ट 2021 ला “माझा निषेध झाला पाहिजे” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे.या काव्यसंग्रहाला ज्येष्ठ साहित्यिक, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी प्रस्तावना लिहिली आहे. (Award for poetry collection by Ravi Bhise)
या पुरस्काराचे संयोजक विरभद्र मिरेवाड तर साहित्यिक अशोक कोळी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. (Award for poetry collection by Ravi Bhise)
काव्य संग्रहाबद्दल सबनीस म्हणतात, “हजारो कवी आहेत पण, स्वतःच्या मनाचे व व्यक्तित्वाचे चरित्र व चारित्र्य मानवी मूल्यांच्या निकषावर परखडपणे तपासून, स्वतःचा धिक्कार करणारी कविता मी फक्त रवी भिसे यांच्याच संदर्भात अनुभवली.”