(farmers law) शेतकरी कायद्यांच्या विरोधात शुक्रवारी एकाचवेळी 25 चौकात निषेध
पुणे : केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या कायद्याविरेधात उद्या शुक्रवारी ( 26 मार्च)राष्ट्रीय पातळीवरील संयुक्त किसन मोर्चाने भारत बंदचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पुण्यातही शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला असून, शहरातील 25 चौकात एकाच वेळी केंद्र सरकारच्या जुलमी धोरणांचा निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली. (farmers law protest in pune)
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने 2014 ला सत्तेवर आल्यापासून एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. लोक कल्याणाच्या नावाने लोक विरोधी आणि धनिक उपोयोगी धोरणे व कायदे केले जात आहेत. निषेध आंदोलन केले जाणार आहे. (farmers law protest in pune)
पेट्रोल, डिझेल, गॅसची झालेली प्रचंड दरवाढ, शेतकरी व सर्वसामान्यांना भिकेला लावणारे कृषी कायदे, दिल्ली आंदोलनात ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले असून, त्याकडे मोदी दुर्लक्ष करीत आहे. कामगारांना गुलाम बनविणारे कामगार कायदे, ४५ वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी, सर्वसामान्यांच्या हक्काच्या बँक, एलआयसी, रेल्वेचे खाजगीकरण इ.या विषयी केंद्र सरकारने केलेल्या जुलमी कायद्याचे निषेध फलक हातात घेऊन 4-5 कार्यकर्ते चौकात उभे राहून निषेध करणार आहेत. (farmers law protest in pune)
या ठिकणी होणार निषेध : सिटी पोस्ट चौक, अलका टॉकीज चौक, शनिपार चौक, दांडेकर पूल, मार्केट यार्ड चौक( सिटी प्राईड जवळ), शनि मंदिर, बिबवेवाडी, अभिनव चौक ( स्वर्गीय वसंतदादा पाटील पुतळा) गजानन महाराज चौक, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ , पुणे विद्यापीठ चौक, बालगंधर्व चौक, गुडलक चौक, बोपोडी चौक, नळस्टॉप चौक, कर्वे पुतळा, कात्रज चौक, मजूर अड्डा, वारजे चौक, गाडीतळ चौक, ज्योती हॉटेल, कोंढवा, संत कबीर चौक, नरपत गिरी चौक, बाटा चौक, लष्कर कोर्ट, पर्णकुटी चौक येरवडा, विश्रांतवाडी चौक, चित्रा टॉकीज चौक येरवडा या ठिकाणी निषेध नोंदविले जाणार आहे. (farmers law protest in pune)