पुणे जिल्हा पुरवठा अधिकारीपदी सीमा होळकर

राज्याच्या महसूल विभागाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे जिल्हा पुरवठा अधिकारीपदी सीमा होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. (Appointment of Seema Holkar as Pune District Supply Officer)

पुणे : राज्याच्या महसूल विभागाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात पुणे जिल्हा पुरवठा अधिकारीपदी सीमा होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. (Appointment of Seema Holkar as Pune District Supply Officer) तर पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले हिम्मत खराडे (Himmat Kharade) यांना उपजिल्हाधिकारी कुळकायदा शाखा येथे पदस्थापना करण्यात आली. 

 

 

 

राज्य शासनाचे सह सचिव माधव वीर (Madhav Veer, Joint Secretary to the State Govt) यांनी राज्यातील अकरा उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि प्रतिक्षेत असलेल्या अधिकाऱ्यांना पदस्थापनेचे आदेश जारी केले आहेत.

 

 

जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (District Supply Officer Surekha Mane) यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्या बदलीसाठी पात्र झाल्या होत्या. त्यांच्या ठिकाणी नियुक्तीच्या प्रतिक्षेत असेलल्या सीमा होळकर यांना पदस्थापना देण्यात आली. (Appointment of Seema Holkar as Pune District Supply Officer) तर सुरेखा माने यांना कुठेही नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.

 

पुणे जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी ज्योती कदम यांची नियुक्ती झाल्यापासून तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे हे नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. त्यांची नियुक्ती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रजा राखी अर्थाक कुळकायदा शाखेचे उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. खेडच्या प्रांतपदी जोगेंद्र कट्ट्यारे (Jogendra Kattyare)यांची बदली करण्यात आली.

Local ad 1