राज्यातील अकरा उपजिल्हाधिकार्‍यांच्या बदल्या ; कोणाची कुठे झाली बदली जाणून घ्या

नागपूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी सुभाष चौधरी

पुणे : राज्यातील उपजिल्हाधिकार्‍यांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात पुणे, औरंगाबाद आणि नागपूर विभागातील (Pune, Aurangabad and Nagpur divisions) अकरा अधिकार्‍यांचा सहभाग आहे. (Transfers of eleven Deputy Collectors in Maharashtra) त्यात नागपूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी पदी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुभाष चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Subhash Chaudhary as Resident Deputy Collector of Nagpur) महाराष्ट्र शासनाचे सह सचिव माधव वीर यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.

 

 

 

पुणे जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने (Pune District Supply Officer Surekha Mane)यांच्या प्रस्तावित बदलीने रिक्त होणार्‍या ठिकाणी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सीमा होळकर (Seema Holkar) यांना पदस्थापना देण्यात आली. हिम्मत खराडे यांची नियुक्ती उपजिल्हाधिकारी रजा राखीव पुणे (Deputy Collector Leave Reserve Pune) येथे करण्यात आली. जतचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे (Jogendra Katyare) याची उपविभागीय अधिकारी खेड-राजगुरूनगर ( Khed -Rajgurunagar) येथे बदली करण्यात आली. तसेच नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले अजय पवार (Ajay Pawar) यांची इचलकरंजी उपविभागीय अधिकारी म्हणून पदस्थापना देण्यात आली.

 

Talathi Recruitment 2023 । तलाठी भरती संदर्भात मोठी अपडेट ; परिक्षा कधी होणार ?

 

शिवकुमार स्वामी (निवासी उपजिल्हाधिकारी ते निवासी उपजिल्हाधिकारी बीड), विश्वास शिरसाट नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांची उपविभागीय अधिकारी अर्वी, जि. वर्षा येथे पदस्थापना देण्यात आली. महेश सागर विशेष भूसंपादन अधिकारी अंबाजोगाई, बीड ते विशेष भूसंपादन अधिकारी, औरंगाबाद या पदावर बदली करण्यात आली. प्रमोद गायकवाड यांची विशेष भूसंपादन अधिकारी बीड ते उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे बदली करण्यात आली.

 

नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुभाष चौधरी यांची निवासी उपजिल्हाधिकारी नागपूर येथे पदस्थापना देण्यात आली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले रवींद्र राठोड यांची उपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर येथे पदस्थपना देण्यात आली. रवींद्र जोगी हेही नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. त्यांना उपविभागीय अधिकारी, चांदुर रेल्वे. जि. अमरावती येथे पदस्थापना देण्यात आली.

Local ad 1