नांदेड जिल्ह्यात लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक घेता येणार
नांदेड : जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्र सक्षम होण्याच्या दृष्टीने शासनाच्यावतीने लोकसहभागातून अंगणवाडी दत्तक धोरण (Anganwadi Adoption Policy) राबविण्यात येत आहे. अंगणवाडी दत्तक धोरणातर्गंत कॉर्पोरेट कंपन्या व त्यांचेमार्फत राबविण्यात येणारा सीएसआर (CSR) कार्यक्रम, अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट, संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब, व्यक्ती, कुटूंब, समूह या सर्व घटकांनी या धोरणात सहभाग घेवून योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (Collector Abhijit Raut) यांनी केले आहे. (Anganwadi adoption policy announced through public participation in Nanded district)