मराठमोळ्या अभिनेत्रिने सोशल मीडियावर शेअर केला वाईट अनुभव

मराठी अभिनेत्री मनवा नाईक (Actress Manwa Naik) हिने प्रवासातील अनुभव फेसबुकवर शेअर केला आहे. त्यात ती ज्या उबेरमध्ये प्रवास करत होती, त्या कारचालकाने (Uber driver) नियम तोडले, त्याला वारंवार सूचना करुनही, त्याने दुर्लक्ष केलं. वाद घातला असून, या घटनेमुळे पुन्हा एकदा महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणावर (The issue of women’s safety) आला आहे. (Actress Manwa Naik shared the bad experience on social media)

 

 

मनवाने (Actress Manwa Naik) आपल्या फोसबुक पोस्टमध्ये आलेला अनुभव मांडला आहे, ती म्हणते “माझ्यासोबत घडलेला प्रसंग तुमच्यासोबत शेअर करायलाच हवा. मी रात्री 8.15 च्या आसपास एक उबर केली होती. वांद्रे-कुर्ला संकुलाच्या आसपास पोहोचल्यावर तो उबर चालक (Uber driver) फोनवर (Phone) बोलत होता. दरम्यान मी त्याला फोनवर न बोलण्याचा सल्ला दिला. अशातच त्याने एक सिग्नल देखील तोडला. मी वारंवार सांगून देखील तो त्याची मनमानी करत होता”. (Actress Manwa Naik shared the bad experience on social media)

 

पुढे गेल्यावर पोलिसांनी उबेरला (Uber driver) थांबवलं. त्याचा फोटोदेखील क्लिक केला. त्यानंतर उबर चालकाने (Uber driver) पोलिसांसोबत ही (Police) हुज्जत घालायला सुरुवात केली. गाडीचा फोटो काढला आहे तर आता आम्हाला जाऊ द्या असे मी पोलिसांना (Police) सांगितलं. त्यामुळे त्या चालकाला राग आला. तो मला म्हणाला,” तू 500 रुपये भरणार आहेस का? त्याला मी म्हटलं,”फोनवर तू बोलत होतास”. त्यानंतर त्याने थांब तुला दाखवतो अशा शब्दांत धमकी द्यायला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

 

 

 

उबर चालकाला मी गाडी पोलीस स्टेशनजवळ घ्यायला लावली. तर त्याने बीकेसीमधील जिओ गार्डन परिसरात गाडी थांबवली. दरम्यान मी त्याला पोलीस स्टेशनला चला सांगत होते. तर तो माझ्या सोबत वाद घालत होता. त्यानंतर मी उबर सेफ्टी ला फोन केला. (Actress Manwa Naik shared the bad experience on social media)

 

 

विश्वास नांगरे पाटील यांनी केलेली कमेंट
विश्वास नांगरे पाटील यांनी केलेली कमेंट

विश्वास नांगरे पाटील यांनी देखील मनवाच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं आहे,”मनवा जी… आम्ही या घटनेची दखल घेतली आहे. Dcp झोन 8 यावर काम करत आहे. तसेच चालकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात येईल”.

प्रियदर्शनी पार्कमध्ये (Priyadarshini Park) पोहोचलेलो असताना मी जोरजोरात हाका मारत ओरडायला सुरुवात केली. त्यावेळी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाने (Rickshaw driver) मला उबरमधून बाहेर काढण्यास मदत केली. आता मी सुरक्षित आहे. पण या प्रसंगामुळे माझी घाबरगुंडी उडाली आहे.”  (Actress Manwa Naik shared the bad experience on social media)

Local ad 1