Pune rape लाजीरवाणी घटना : बसचालकाचा 21 वर्षिय महिलेवर बलात्कार

पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरात एक लाज आणनारी घटना उघडकीस आली आहे. एका 21 वर्षीय  महिलेवर खासगी बसचालकाने दोनवेळा बलात्कार केला असून, आरोपी बस चालकाला पोलिसांनी काही वेळातच बेड्या ठोकल्या आहेत. (21-year-old woman raped by bus driver in Pune)

 

वाशिम जिल्ह्यातील (Washim District) दाम्पंत्य (couple) कामासाठी पुण्यात आलं होतं. शनिवारी (Saturday) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास स्वारगेट परिसरात झोपण्यासाठी जागा शोधत होते. त्याचवेळी एका बस चालकाने (Bus driver) उघड्यावर कुठे झोपता माझ्या बसमध्ये झोपा, असे सांगितले. दाम्पत्याने विश्वास ठेवून बसमध्ये झोपले. परंतु पहाटेच्या सुमारास पती हा लघुशंकेसाठी बाहेर गेला. त्यावेळी बसचालकाने बस पळवून नेऊन महिलेवेर दोन वेळा बलात्कार केला.  (21-year-old woman raped by bus driver in Pune)
  •  नवनाथ शिवाजी भोंग (वय ३८, रा. मु. पो. वडापुरी, ता. इंदापूर) असे अटक केलेल्या बसचालकाचे नाव आहे. याप्रकरणी वाशीम जिल्ह्यातील एका २१ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (21-year-old woman raped by bus driver in Pune)

 

 

 

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे पुण्यात आले होते. ते राहण्यासाठी खोली शोधत होते. स्वारगेट एसटी बस स्थानकाजवळ शनिवारी रात्री साडेअकरा वाज होते. तेव्हा रस्त्याच्या कडेला थांबलेल्या नवनाथ भोंग याने त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यांनी खोली शोधत असून, आता स्टँडवर झोपायला जात असल्याचे सांगितले. त्याने माझ्या गाडीत झोपा असे सांगून त्यांना गाडीत झोपायला जागा दिली. पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या पतीला लघुशंका लागली. तेव्हा त्याने पतीला स्वारगेट बस स्टँड वरील स्वच्छतागृहात नेले. तो आत गेल्यावर भोंग हा तेथून पळून गाडीकडे आला. त्याने बस लांबवर नेले. एका बाजूला बस उभी करुन त्याने महिलेवर एका पाठोपाठ दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर त्याने या महिलेला बसमधून ढकलून देऊन तो बस घेऊन निघून गेला.

  • दरम्यान, फिर्यादीचा पती तेथे आल्यावर बस दिसली नाही, म्हणून त्याने शोधाशोध सुरु केली. तेव्हा काही वेळाने त्याला आपली पत्नी दिसून आली. तिने भोंग याने केलेल्या कुकर्माची माहिती पतीला दिली. ते पहाटे ५ वाजता स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आले.  (21-year-old woman raped by bus driver in Pune)

 

 वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी तातडीने दोन पथके तयार करुन शोध सुरु केला. तेव्हा सातारा रोडवरुन ही संशयित बस एका पथकाला दिसली. त्यांनी हात दाखवून बस थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने बस थांबविली नाही. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. बिबवेवाडी येथे बस थांबली. बसचालक बस सोडून पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. (21-year-old woman raped by bus driver in Pune)
Local ad 1