Maharashtra SSC Result 2025 Date : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. एकीकडे सगळ्या बोर्डांचे निकाल जाहीर आहेत. या दरम्यान आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच मंगळारी १३ मे रोजी जाहीर होणार आहे. (Maharashtra SSC Class 10 results 2025 likely tomorrow)
Related Posts
यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. १३ मे रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. (Maharashtra SSC Class 10 results 2025 likely tomorrow)
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. ऑनलाइन मार्कशीटमध्ये विषयवार गुण, जन्मतारीख आणि रोल नंबर समाविष्ट असेल.