नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश
नांदेड : नांदेड जिल्ह्यात शनिवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 नोव्हेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश (Anti-mob orders ban on arms in Nanded district) लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात शनिवार 22 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 5 नोव्हेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी (Anti-mob orders ban on arms in Nanded district) आदेश लागू राहील.