ZP Pune Bharti 2023 | Zilla Parishad Pune Recruitment 2023 ।जिल्हा परिषद भरतीला सुरुवात ; एक हजार जागांसाठी भरती 

ZP Pune Bharti 2023 | Zilla Parishad Pune Recruitment 2023 । पुणे : जिल्हा परिषद भरतीप्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून, गट क’ सवंर्गातील 21 विविध विभागांतील एक हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी आजपासून रात्री बारा वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक ओपन खुली केली जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) राहुल गावडे यांनी दिली. (ZP Pune Bharti 2023 | Zilla Parishad Pune Recruitment 2023)

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी यापूर्वी 2019 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र ही भरतीप्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. परिक्षेसाठी अर्ज केलेल्या 60 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. तर गेल्यावेळी भरलेले परिक्षा शुल्क परत मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे एक कोटी 28 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
प्रत्यक्षात पुन्हा एकदा भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण 20 संवर्गातील जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती राबविण्यात येत आहे. सर्वाधिक नाशिक जिल्हा परिषदेत 1 हजार 38 आणि त्यापाठोपाठ पुणे जिल्हा परिषदेत 1 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे.

आयबीपीएस कंपनीमार्फत ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येत असून,  अर्ज करण्यासाठी 5 ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर करावे लागणार आहे. अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून अर्ज करू नये. असे अर्ज बाद ठरविले जातील. मात्र वेगवेगळ्या पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची मुभा आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 हजार, तर आरक्षित उमेदावासाठी 900 रुपये अर्ज शुल्क आहे. अर्ज आणि पदाची सर्व माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जासाठी लिंक :  https:ibpsonline.ibps.in/zpvpiun23/

जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 60 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे अर्जासोबत भरलेली शुल्काची रक्कम उमेदवारांना परत केली जाणार आहे. एवढेच नव्हे, तर या सर्व उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे.
Local ad 1