ZP Bharti 2023 । जिल्हा परिषद कर्मचारी भरतीला लागला मुहूर्त !

'या' तारखेला प्रसिद्ध होणार जाहिरात

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील रिक्त जागांसाठी भरती होणार (Recruitment will be held for vacancies in Zilla Parishad) अशी चर्चा होत आहे. मात्र, त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी प्रशासनाला अडचणी येत होत्या. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नोकर भरतीला मुहूर्त लागला आहे. पुणे जिल्हा परिषदेत 1 हजार आठ कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा असून या महाभरती मध्ये त्या भरल्या जातील. (Zilla Parishad Pune Recruitment – ZP Bharti 2023)

 

 

भरतीसाठी असणाऱ्या त्रुटी दूर झालेल्या असून जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात जाहिरात झळकण्याची शक्यता आहे. नऊ वर्षापासून म्हणजेच २०१४ पासून जिल्हा परिषद कर्मचारीभरतीसाठी अभ्यासक्रम निश्चित नव्हता. यामध्ये अनेक बदल झाले असल्याने शासनाने अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. त्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार नोकर भरती होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात दोन जुलैच्या दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी भरतीची (ZP Bharti 2023) महा जाहिरात घोषित करण्याची तयारी ग्रामीण विकास विभागाने केली आहे.  राज्यात तलाठी, शिक्षक, कृषी सहाय्यक आणि त्यानंतर आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे भरती होणार असल्याने त्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र परीक्षा स्वतंत्र दिवशी घेतली जाईल. यामध्ये संवर्गनिहाय मराठी, इंग्रजीसंबंधित प्रश्न, सामान्य ज्ञान, बुद्धिमापक आणि गणिताचे प्रश्न, तांत्रिक प्रश्न, प्रश्नपत्रिकेचा दर्जा, काठिण्य पातळी आणि परीक्षेची वेळ निश्चित केली जाणार आहे.

 

जिल्हा परिषच्या एकूण सर्व २७ संवर्गांसाठी अभ्यास निश्चित करण्यात आला आहे. कनिष्ठ सहायक या पदाकरिता यापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता होती. त्यामध्ये बदल करून आता या संवर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा लागेल. याशिवाय अन्य संवर्गासाठी शैक्षणिक पात्रता यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहे. ज्या संवर्गात तांत्रिक प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याची काठिण्य पातळी समजून येण्यासाठी हा अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

 

आयबीपीएस एजन्सी घेणार परिक्षा

‘आयबीपीएस’ एजन्सी परीक्षेसाठी जिल्हा परिषदेने ‘आयबीपीएस’ ही एजन्सी नियुक्त केली आहे. शासनाने संवर्गनिहाय परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित केल्याने आता परीक्षेचा पेपर काढणे आणि पेपरतपासणी, तसेच अनुषंगिक कार्यवाही या एजन्सीमार्फत होणार आहे. एकाच दिवशी होणार परिक्षा पुणे जिल्हा परिषदेमध्ये १००८ रिक्त (ZP Bharti 2023) जागांसाठी ही कर्मचारीभरती असेल. भरतीसाठी रीतसर जाहिरात काढून अर्ज मागविले जातील. या परीक्षेच्या काळात इतर परीक्षा असणार नाही. राज्यस्तरावर सर्व जिल्हा परिषदेसाठी एकाच दिवशी एकाच संवर्गाची परीक्षा असेल.

Local ad 1