ZP Pune Bharti 2023 | पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांची भरती ; सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ZP Pune Bharti 2023 | पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील सरळसेवेतील भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यात गट क’ सवंर्गातील (Group C) 21 विविध विभागांतील एक हजार पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, कोणत्या पदाला किती जागा, आरक्षणनिहाय किती जागा भरल्या जाणार आहेत, जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. (ZP Pune Bharti 2023 | Recruitment of 1000 thousand seats in Pune Zilla Parishad)

 

 

ZP Pune Bharti 2023 | Zilla Parishad Pune Recruitment 2023 ।जिल्हा परिषद भरतीला सुरुवात ; एक हजार जागांसाठी भरती 

 

पुणे जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी यापूर्वी 2019 मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र ही भरतीप्रक्रिया शासनाच्या वतीने स्थगित करण्यात आली होती. परिक्षेसाठी अर्ज केलेल्या 60 हजार विद्यार्थ्यांना आताच्या भरती प्रक्रियेत दिलासा मिळणार आहे. मात्र, त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. तर गेल्यावेळी भरलेले परिक्षा शुल्क परत मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडे एक कोटी 28 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.

 

अर्ज करण्यासाठी येथे करा क्लिक

https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/

 

राज्य शासनाने मान्यता दिल्यानंतर राज्यभरात एकूण 20 संवर्गातील जागांसाठी प्रत्येक जिल्हा परिषदेत सरळ सेवा भरती राबविण्यात येत आहे. सर्वाधिक नाशिक जिल्हा परिषदेत 1 हजार 38 आणि त्यापाठोपाठ पुणे जिल्हा परिषदेत 1 हजार जागांसाठी ही भरती होणार आहे. (ZP Pune Bharti 2023 | Recruitment of 1000 thousand seats in Pune Zilla Parishad)

 

आयबीपीएस कंपनीमार्फत ही सर्व प्रक्रिया राबविण्यात येत असून, अर्ज करण्यासाठी 5 ते 25 ऑगस्ट अशी मुदत देण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर करावे लागणार आहे. अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

शुल्क किती आणि कुठे कराल अर्ज ?

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1 हजार, तर आरक्षित उमेदावासाठी 900 रुपये अर्ज शुल्क आहे. अर्ज आणि पदाची सर्व माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जासाठी लिंक : https:ibpsonline.ibps.in/zpvpiun23/

2019 मध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. त्यासाठी 60 हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र ही परीक्षा होऊ शकली नाही. त्यामुळे या सर्व उमेदवारांना वयामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र या उमेदवारांना आताच्या परीक्षेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे.

 

संपूर्ण जाहिरात पहाण्यासाठी लिंकवर करा क्लिक

Zp Pune Bharti 2023

 

 

Local ad 1