पनवेल-नांदेड एक्सप्रेस प्रवाशांनी पुण्यात रोखून धरली ; काय आहे कारण जाणून घ्या

पुणे : नांदेड, परभणी, लातूर जिल्ह्यातील नागरिकांना मुंबई, पुणे (Nanded, Parbhani, Latur Mumbai, Pune) येथे ये-जा करण्यासाठी नांदेड-पनवनेल एक्सप्रेस ही रेल्वे सोयीची आहे. मात्र, रेल्वा प्रशासनाच्या गलथान कारभारचा फटका प्रवशांना नेहमी बसत असते. परंतु मुंबईवरुन नांदेडकडे निघालेली रेल्वे प्रवशांनी पुणे स्थानकांवर रेल्वे रोखून धरली. त्यामुळे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडाली. (Panvel-Nanded Express stopped by passengers in Pune)

 

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली पनवेल-नांदेड एक्सप्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळ (cockroach) झाले आहेत. त्या संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांनी केली. मात्र, प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे रेल्वे पुणे स्थानकावर आल्यानंतर रेल्वे रोखून धरली असल्याचे सांगण्यात आले.

 

पनवेल-नांदेड एक्सप्रेस मधील वातानुकूलित डब्या (डी 1) मध्ये प्रवाशांना झुरळांचा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुंबईहून निघालेली ही गाडी प्रवाशांनी पुणे स्थानकावर आल्यानंतर रोखून धरली आणि याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. जोपर्यंत गाडीची स्वच्छता होत नाही तोपर्यंत आम्ही गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रवाशांनी घेतली.

 

मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि रेल्वे सुरक्षा बलाने या डब्यामध्ये जाऊन प्रवाशांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवसी आपल्या भूमिकेवर ठाम होते. प्रशासनाने लेखी अश्वासन दिल्यानंतर रात्री सव्वा आठच्या सुमारास ही गाडी नांदेडच्या दिशेने रवाना झाली.

 

Local ad 1