Prices of tomatoes increase । टोमॅटोचे दर का वाढले ? कृषी आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Prices of tomatoes increase । पुणे : सध्या टोमॅटोचे दर वाढल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहे. तर दुसरीकडे स्वयंपाक घरातून ही टोमॅटो हद्दपार झाले आहे. त्यामुळे अशी स्थिती का निर्माण झाली ?, टोमॅटोचे उत्पादन का घटले, याविषयी राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Agriculture Commissioner Sunil Chavan) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Why did the prices of tomatoes increase? Important information given by Agriculture Commissioner)

 

 

टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६-५७ हजार हेंक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते.

 

 

जुलै २०२३ मध्ये बाजारात टोमॅटोचे वाढलेले दर लक्षात घेता या कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १ जुलै आणि दिनांक ११ जुलै रोजी कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्ह्याचे अधीक्षक कृषी यांच्या समवेत सदर प्रश्नांचे अनुषंगाने बैठक घेण्यात आली.

 

 

बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप २०२३ हंगामातील क्षेत्र आणि उत्पादना बाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात डिसेंबर २०२२ ते में २०२३ दरम्यान टोमॅटोला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने (डिसेंबर २०२२ ते फेब्रवारी २०२३ दरम्यान ६ ते ९ रुपये प्रति किलो, मार्च २०२३ दरम्यान ११ रुपये प्रति किलो व एप्रिल २०२३ ते मे २०२३ दरम्यान ८ ते ९ रुपये प्रति किलो शेतक्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

 

या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामूळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला याचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जुन महिन्यात जवळपास १५ दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम ५४ टक्के झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला आहे. टोमॅटो पिकावरील कीड व रोग याबाबत देखील या बैठकीत चर्चा करून नवीन जाती, कीड आणि रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना ययावर चर्चा करण्यात आली. सद्या शेतकरी नविन टोमेंटोची लागवड करत आहेत. याबाबत येत्या ७-८ दिवसात वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल, असे चव्हाण यांनी सांगितले.

टोमेंटो लागवडीबाबत नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमुख क्षेत्र असून त्या जिल्ह्यांच्या अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कडून प्रामुख्याने नवीन लागवडी बाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.

Local ad 1