नांदेड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत होती.परंतु बुधवारी नांदेकरांसाठी चांगली बातमी आली असून, एकही रुग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 558 अहवालापैकी निरंक अहवाल कोरोना बाधित आले आहेत. (Today is good news for Nandedkar)
जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 363 एवढी झाली असून यातील 87 हजार 692 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 19 रुग्ण उपचार घेत असून, 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
*नांदेडमध्ये भाजपला पुन्हा झटका ; ‘हे’ नेते करणार काँग्रेसमध्ये घरवापसी*
👇👇
नांदेडमध्ये भाजपला पुन्हा झटका ; ‘हे’ नेते करणार काँग्रेसमध्ये घरवापसी
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एन.आर.आय.भवन व गृह विलगीकरण 1 असे एकूण 2 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. Today is good news for Nandedkar
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, किनवट कोविड रुग्णालय 1, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 16 व्यक्ती उपचार घेत आहेत.