नांदेड जिल्हा कोरोना अपडेट । Nanded corona update
नांदेड : Nanded corona update । जिल्ह्यात शनिवारी प्राप्त झालेल्या 714 अहवालांपैकी 712 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले. त्यात एकही कोरोना बाधित आढळला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात आतापर्यंत 90 हजार 305 कोरोना रुग्ण आढळले असून, यातील 87 हजार 624 रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 29 रुग्ण उपचार घेत आहेत. तर त्यातील 3 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. (Nanded corona update)
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण 1, खाजगी रुग्णालयातील 2 असे एकुण 3 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. (Nanded corona update)
जिल्ह्यात 29 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 15, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 5, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत.