नांदेडकरांसाठी चांगली बातमी : आज आढळले शून्य कोरोना बाधित
नांदेड Nanded news : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून एक अंकी संख्येत कोरोना बाधित रुग्ण आढळत होते. परंतु सोमवारी प्राप्त झालेल्या 649 अहवालात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. त्यामुळे सोमवार नांदेडकरांसाठी सुखद धक्का देणारा ठरला आहे. (No corona patient was found in Nanded today)
जिल्ह्यात सोमवारी प्राप्त झालेल्या 649 अहवालामध्ये एकही व्यक्ती कोरोना बाधित आढळली नाही. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 282 एवढी आहे. यात 87 हजार 600 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या घडीला 31 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (No corona patient was found in Nanded today)
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आज जिल्ह्यात मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.
आज 31 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 9, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 12, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 4 व्यक्ती उपचार घेत आहेत. (No corona patient was found in Nanded today)