नांदेड जिल्ह्यात वीज कोसळून तिघे ठार

नांदेड : भोकर तालुक्यातील पाळज शिवारातील शेतात पेरणीचे काम करित आसलेल्या तीन शेतमजुरांवर वीज कोसळी, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सायंकाळी पाच वाजता घडली. (Three killed in Nanded power outage)

 

 

पाळज येथील  राजेश्वर मुत्येन्ना चटलावार (वय 45), भोजेन्ना पोशट्टी रामणवाड (वय 36), साईनाथ किशन सातमवार (वय 32) हे तिघे पेरणीचे काम करत होते. त्याचवेळी आचानक आलेल्या वादळीवारा व विजेच्या कडकडाटाह सुरू झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी करण्यासाठी झाडाखाली गेले आसता झाडावर विज पडल्याने त्या तिघाही शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Three killed in Nanded power outage)

 

 

घटनेची माहीती कळताच उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, तहसीलदार राजेश लांडगे, राजकुमार मस्के (तलाठी पाळज), पंजाबराव मोरे (तलाठी किनी),सचिन आरू (मंडळाधिकारी मोघाळी) यांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केली. (Three killed in Nanded power outage)

Local ad 1