गावठाणापासून २०० मीटर आतील जमीन NA करुन घेण्याची संधी

पुणे : गावाच्या गावठाणापासून २०० मीटरच्या परिघातील आणि अंतिम प्रादेशिक योजनेमध्ये विकासयोग्य झोनकरीता वाटप केलेल्या क्षेत्रातील कोणतीही जमीन देय रक्कम जमा करून जमीन अकृषिक  (NA) करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी केले आहे. (Take the land NA within 200 meters from the village)

 

 

गावठाणापासून २०० मीटर क्षेत्रातील अशी जमीन त्या क्षेत्राला लागू असलेल्या विकास नियंत्रण नियमांच्या अधीन राहून निवासी प्रयोजनासाठी अकृषिक वापरात रुपांतरीत केली असल्याचे मानण्यात येणार आह आणि ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी घोषित करण्यात येईल. (Take the land NA within 200 meters from the village)

जमीन भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकाराची असल्यास अशा जमिनीच्या मानीय अकृषिक रूपांतरणापोटी देय नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय देणी भरून  सदरची जमीन महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील तरतूदीनुसार  अकृषिक वापरात रूपांतरीत झाल्याचे समजण्यात येणार आहे. (Take the land NA within 200 meters from the village)

आवश्यक रक्कम जमा केल्यानंतर जमीन अकृषिक करण्याची प्रक्रीया करण्यात येणार आहे.  नागरिकांच्या सुविेधसाठी ही प्रक्रीया मोहिमस्तरावर राबविण्यात येणार असल्याने नागरिकांना या क्षेत्रात घर बांधणे किंवा इतर प्रयोजनासाठी नियमानुसार जमीनीचा उपयोग करणे शक्य होणार आहे. जमीन अकृषिक करण्यासाठी इतर कागदपत्रांच्या पुर्तता करण्याचीदेखील आवश्यकता असणार नाही. (Take the land NA within 200 meters from the village)

भोगवटादाराने रक्कम भरल्याच्या दिनांकापासून साठ दिवसांच्या कालावधीत विहीत केलेल्या नमुन्यात सनद देण्यात येईल व त्यानुसार सदरची जमीन अकृषिक झाल्याचे समजण्यात येईल. या योजनेचा लाभ अधिकाधिक जमिनधारकांनी आणि मिळकतधारकांनी  घ्यावा आणि तहसिलदारांकडे अर्ज करून जमीन अकृषिक करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. (Take the land NA within 200 meters from the village)

 

एनए प्लॉट (NA Plot) हे काय असते?

नॉन ऍग्रीकल्चर जमीन म्हणजे एन ए जमीन ! थोडक्यात शेती सोडून घर , इमारत बांधण्यासाठी वापरात आणलेली जमीन. अकृषिक कारणांमुळे वापर होत असलेली जमीन. जमिनीचे छोटे तुकडे पाडून त्याचा वापर रहिवासी घर किंवा इमारत यासाठी केला जातो. त्याला जमिनीचे रेखांकन म्हणतात. या रेखांकन केलेल्या जमिनीचा एक तुकडा म्हणजे एन ए प्लॉट होय. त्यासाठी नगरपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रात घर किंवा इमारत बांधण्यासाठी जमीन एन ए केलेली असावी लागते.

जमिनीचे तीन प्रकार

  • कृषी प्रयोजनासाठी Agriculture Land
  • अकृषिक प्रयोजनासाठी Non Agriculture Land
  • औद्योगिक वापरासाठी Industrial N A
Local ad 1