पुणे रिंगरोडचे भूसंपादनाला गती येणार

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (Maharashtra State Road Development Corporation) पूर्व व पश्चिम रिंगरोडसाठी (East and West Ring Road) मूल्यांकनाची (assessment) प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण करा, तसेच पश्चिम रिंगरोडसाठी येत्या डिसेंबरपर्यंत भूसंपादन पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रकल्प विभागाचे महासंचालक राधेश्याम मोपलवार (Director General of Project Department Radheshyam Mopalwar) यांनी दिल्या आहेत. (Land acquisition of Pune Ring Road will speed up)

 

पुणे येथील विधानभवन येथे रिंगरोड प्रकल्पाचा (Pune Ring Road Project) आढावा बैठक मोपलवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्यासह जिल्हा प्रशासन व एमएसआरडीसी चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

मूल्यांकनाचे काम वेगाने झाले तरच भूसंपादनासाठीचा दर जाहीर करणे शक्य होणार आहे. मूल्याकंनाच्या कामासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी फळबागा, विहिरी यांचे मूल्याकंन लवकरात लवकर करावे. त्यासाठी नोव्हेबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुदत दिली आहे.  (Land acquisition of Pune Ring Road will speed up)

 

 

रिंगरोडचे पूर्व व पश्चिम असे दोन टप्पे

पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता.भोर ) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यातून जाणार आहे. तर पश्चिम रिंगरोडला केळवडे पासून सुरुवात होणार असून, हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. रिंगरोडच्या पश्चिम भागातील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. रिंगरोडसाठी 695 हेक्टर जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे. तर पूर्व रिंगरोडसाठी 1 हजार 16 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे.   (Land acquisition of Pune Ring Road will speed up)

 

 

जिल्हा प्रशासनाकडे वर्ग झाला निधी..

पहिल्या टप्प्यात पश्चिम भागातील रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. भूसंपादनापोटी द्यावयाच्या मोबदल्यासाठी दर निश्चित करण्याचे काम गतीने सुरु आहे. रिंगरोडच्या भूसंपादनासाठी बजेटमध्ये दिड हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडे टप्प्याटप्याने पैसे वर्ग केले जात आहे.  (Land acquisition of Pune Ring Road will speed up)

Local ad 1