मोठी बातमी : राज्य सरकार एक लाख पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याच्या तयारीत

Private Job : सध्या जुनी पेन्शनसाठी (Old Pension) राज्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी संपावर (Government and semi-government employees on strike) गेले आहेत. त्यातच आता राज्य सरकारने (privatization of government jobs) एक लाख नोकऱ्या खाजगी कंत्राटदारांमार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे. (The state government is preparing to fill one lakh posts on contract basis)

 

 

 

 

ज्या अधिकाऱ्यांना महिना दोन ते अडीच लाख रुपये वेतन द्यावे लागणार आहे, अशा वर्ग एकच्या (क्लास वन) पदांपासून ते वर्ग चार (क्लास फोर) पदांपर्यंत एक लाख पदे खाजगी पद्धतीने भरली जाणार आहेत. (The state government is preparing to fill one lakh posts on contract basis)

 

 प्रशासकीय यंत्रणेत या (Administrative system) निर्णयामुळे आमूलाग्र बदल होणार आहे. एरवी जी कामे करण्याची जबाबदारी सनदी अधिकाऱ्यांची (IAS Officer) असते, अशी महत्वाची कामे खाजगी कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचबरोबर  पदांपासून ते स्वच्छता कर्मचारी, ड्रायव्हर, माळीकाम करणारे अशा क्लास फोरच्या पदांची भरती देखील खासगी कंपन्यांच्या मार्फत करण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारने दहा खाजगी कंपन्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

 

सरकारच्या या निर्णयाची उलट प्रतिक्रिया एमपीएससी ची (MPSC) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये उमटली आहे. खासगीकरणामुळे एमपीएससी मार्फत भरली जाणारी पदे कमी होणार असल्याने विद्यार्थ्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. (The state government is preparing to fill one lakh posts on contract basis)

Local ad 1